“फुलपाखरू”
एन्द्रधनुच्या सप्तरंगी रंगा,
परी आहेस तू.
फुला पेक्षा सुंदर असे,
फुलपाखरू तू…
फुलझाडांच्या बागेत जाऊन,
सुंदर फुलांचा रस,गोळा करतेस तू.
फुलांना पण हेवा वाटतो,
असे सुंदर फुलपाखरू तू…
चित्रविचित्र नक्षीने पंखाची तुझी,
स्पर्श करताच घाबरतो तू.
लहान थोरान्चे लक्ष आकर्षून घेतो,
असे सुंदर फुलपाखरू तू…
शरीरा पेक्षा पंख तुझे मोठे,
तरी उडाण बरोबर घेतोस तू.
पंखाचे रंग तू सोडतो,
असे सुंदर फुलपाखरू तू…